वा चित्तोपंत,
फारच सुंदर रचना. (याला विडंबन म्हणावंसं वाटत नाही.)
बोलू नकोस काही
एकांत दर्वळू दे .. हा शेर सर्वांत आवडला.
मज ओंजळीत घे, पण
थोडे उचंबळू दे! .. वा!
जे बोललोच नाही,
तेही तुला कळू दे.... हा शेरही सहज-सुंदर आहे.
गझल आवडली.
- कुमार
ता.क.
'मार्केट कोसळू दे
सेन्सेक्स आदळू दे'
असं आजच सुचलं होतं... (मार्केट आज वर गेल्यामुळे पुढचं विडंबन रद्द केलं.. शिवाय चुकून ही प्रार्थना 'त्या'नं ऐकली, तर आमचंच नुकसान व्हायचं! ).