महाविद्यालयात शिकत असताना आम्हाला कलाल आडनावाचे एक प्राध्यापक होते. त्यांनी सांगितल्यानुसार दारू गाळण्याचा व्यवसाय करणाऱ्यांना कलाल असे म्हणतात. त्यावरून दारू गाळण्याच्या प्रक्रियेला कलाली म्हणत असावेत असा अंदाज केला. तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा.
काकळूत शब्दाचा अर्थ मलाही समजला नाही. तो काकुळत असा असेल तर अर्थ लागतो.
कठीण शब्दापासून काठिण्य शब्द होत असल्यामुळे मलाही काठिन्य अशुद्ध वाटले. मात्र (चुकीच्या शब्दाच्या) अतिवापरामुळे काठिन्य हा शब्द मान्यता पावला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.