मी गीतसंगीत क्षेत्रात अगदी 'माठ' आहे. मी कधीच या गोष्टी तितक्याशा गंभीरपणे अनुभवायचा प्रयत्न केला नाही. घरकाम/अभ्यास करताना मन उल्हसित राहण्यासाठी ऐकायला सहजी उपलब्ध होईल असं काहितरी बॅग्राउंडला लावायचं, ऐकायचं, त्यासोबत गुणगुणायचं, झालंच तर नाचायचं इतकंच काय ते मला माहिती !
साधन म्हणायचं तर एक जीवलग बाजा ( माऊथऑर्गन ) आहे फक्त बस्स ! 'कीबोर्ड' सुद्धा साधन असेल तर ते आहे माझ्याकडे फक्त हापिसात, जे मी रोज वापरत असते. ( याबद्दलचा माझ्या बाबांचा सगळा 'राग' मला माहिती आहे ! )
रोजचा व्याप सांभाळून शिकता येणार असेल तर मला शिकायला जरूर आवडेल. कधी करताय शिकवायला सुरूवात?