'इंटेलिजन्ट डिझाइन'
कॅन्सास् राज्यातही ही थिअरी शाळांतून शिकवावी याचा (सफल?) प्रयत्न झाला आहे असे वाटते.
गर्भपातविरोध / Roe vs. Wade (गर्भपाताचा वैधानिक हक्क ज्या पुरातन खटल्याच्या निर्णयाद्वारे स्त्रियांना प्राप्त झाला) हे तर सनातन वादाचे विषय!
गर्भपात हा सर्वस्वी त्या स्त्रीचा आणि/अथवा त्या दाम्पत्याचा निर्णय आहे असे वाटते. ज्यांना ते धर्मविरोधी वाटते त्यांनी ते करू नये. पण राज्यव्यापी/देशव्यापी बंदी आणणे हे व्यक्तिस्वातंत्र्यविरोधी आहे असे वाटते. अपत्यसंख्येचा आणि आर्थिक सुबत्तेचा संबंध असावा असे वाटते. काही दाम्पत्यांसाठी तो सरळ-सरळ असेल तर काहींसाठी तो आडवळणाने असेल असे वाटते.
मध्ये वॉलमार्ट मध्ये एका औषधविक्रेत्याने 'मॉर्निंग आफ्टर' (रात्री निरोधाशिवाय समागम झाला असता गर्भधारणेची शक्यता कमी करणारी) गोळी विकायला नकार दिला. का? तर ते त्याच्या धर्मविरोधी आहे म्हणून. आपल्या व्यक्तिमत्त्वावर धर्माचे प्रतिबिंब पडणे सहज शक्य आहे. आपल्या व्यवसायावर आपल्या धर्माचे प्रतिबिंब पडू देऊ नये असे वाटते.