अमितराव, अतिशय उपयुक्त माहिती इथे दिल्याबद्दल आपले धन्यवाद. विचार तर चांगले आहेतच, माहिती भाषांतरित करून येथे उतरवणे हे देखील तसे कष्टाचे काम आहे.
प्रथम एकही अभिप्राय नव्हता, म्हणून वाटले की कोणालाच यात रस दिसत नाही, आपण उगाच एवढं सगळं केलं का काय.
शनिवार रविवार मनोगतावर वाहतूक कमी असते हे त्यामगचे कारण असू शकेल.
थोडासा संक्षिप्त तक्ता शालेय अभ्यासक्रमात शिकवला जातो असे वाटते. आधुनिक आहारशास्त्र वाचताना आपण थोडेसे सावध राहिले पाहिजे. त्यातली माहिती आयुर्वेदाच्या तत्त्वांवर घासून मगच ती स्वीकारली पाहिजे. काही वेळा हे आहरतज्ज्ञ 'तूप खाऊ नका' वगैरे क्रूर सल्ले देतात, असल्या सल्ल्यांकडे थोडासा काणाडोळा करायला हरकत नाही असे वाटते.
मराठी माणसाचा रोजचा आहार कसा सर्वंकष असतो ह्याचे एक उदाहरण म्हणजे वरणभात (किंवा आमटीभात.) -
१. भात - पिष्टमय पदार्थ (कार्बोहाय्ड्रेट्स)
२. वरण - प्रथिने (प्रोटीन्स)
३. तूप - स्निग्ध पदार्थ (फॅट्स)
४. मीठ - खनिजे (मिनरल्स)
५. लिंबू - जीवनसत्वे (विटॅमिन्स)
अर्थात हा काही खर्या अर्थाने संपूर्ण आहार नाही पण त्याची व्याप्ती केवढी आहे बघा.
सगळेच जण वरणभात खातात का ह्या प्रश्नाचे उत्तर नाही असे असू शकेल. आपला पारंपारिक आहार हा ऋतुमान, दिनमान, त्या त्या व्यक्तीचा दिनक्रम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या त्या व्यक्तीची तत्कालीन प्रकृती ह्या सार्यांचा विचार करून ठरवलेला असतो असे वाटते.
आणखी बरेच काही लिहिण्यासारखे आहे ते पुन्हा केव्हातरी.
आपला
(सात्विक) प्रवासी