भोमेकाका,

काही मतांशी मी सहमत आहे. तुम्ही खुप सखोल विचार केलात हे पाहुन बरे वाटले.

माझे विचार हे माझ्या अमेरीकेतील अनुभावावरुन आहेत.

चीनची आर्थिक प्रगती - चीनचे परदेशस्थ नागरिक... जे आपल्या देशात एकतर परत गेले आहेत किंवा ये-जा करत आहेत."

*१-  काही उदाहरणेः
बरेच अनीवासी भारतीय (जे अमेरीकेत जन्मले, किंवा खुप वर्ष (१० किंव्वा जास्त) अमेरीकेत आहेत त्यांचा भारताशी अतीशय कमी संम्मद्द येतो. 
काही अनीवासी भारतीयांचे ८०% नातेवाईक अमेरीकेत आहेत.
काही अनीवासी भारतीय भारता बद्दल 'माझ्या पालकांची कंट्री', माझी नाही म्हणुन अभीमानाने सांगतात.
काही अनीवासी भारतीय अमेरीकेत आलो म्हणजे आपण ईतरांपेक्शा खुप वरच्या दर्जाचे आहोत असे समजुन ईतर भरतीयांशी संम्मध ठेवणे कमीपणाचे मानतात.

मलातर एक भारतीय (जो वयाच्या १ - २ र्या वर्षी अमेरीकेत आला) त्याचे नाव 'रामक्रुश्ण' होते.. त्याला मी नाव विचारल्यावर तो 'रेमाकीस' म्हणाला... मी २ - ४ वेळा विचारुन अंदाजे त्याला 'रामक्रुश्ण' का? म्हण ल्यावर तो हो म्हणाला - "येस, आय केन नाट टोक ईंडीयन". तो माणुस 'वॉलमार्ट' ह्या ठीकाणी साधा नोकर होता. तो अमेरीकेत आल्यानंतर भारतात एकदाही गेला नव्हता..

हि काही उदाहरणे आहेत. अजुन चांगले / वाईट अनुभव असतील..

ह्यावरुन असे दिसते, सर्व अनीवासी भारतीयांपासुन फ़ायदा होत नाही, जे अमेरीकेतच जन्मले, त्यांच्या कडुन जास्त अपेक्षा ठेवणे अवघड्च!!

अमेरिकेचे इस्त्राईल प्रेम
- इस्त्राईलचा आज जगात कितवा नंबर आहे ते मला माहीत नाही.. पण नक्कीच खुप वरच नसावा..

परदेशस्थ लोकांच्या भारतीय बँकांतल्या ठेवी-
अमेरीकेत कायम रहाणारे शक्यतो, अमेरीकेत घर, सरकरी योजना ई. मधे गुंतवतात. कारण, त्यांना संप्पत्ती व्यवस्थापन सोपे जाते.
पण जे येथे कायम स्व्ररुपी नाहीत, ते तुम्ही म्हणता तसे करतात.

भारतात कमाई करणारे सगळेचजण देशाला परकीय चलन मिळवून देत असतील असे वाटत नाही.
बरोबर. पण, फ़क्त परकीय चलनानेच देशाची प्रगती कशी होणार?
उदाः पोलीस - समाज व्यवस्था ठेवतो (वादाचा मुद्दा..?) शिक्षक - समाज घडवतो, सैनीक - संरक्षण करतो. ईत्यादी..

देशावरील नैसर्गिक संकट
सहमत

परदेशात गेलेल्या पहिल्या पिढीला एका माणसाच्या पगारावर आर्थिक सुबत्ता मिळवायला वेळ लागतो म्हणून त्याचा/तिचा जोडीदार या-ना-त्या प्रकारे तिथे कमाई चालू करतो. त्यातला काही अंश अर्थातच भारतात पाठवला जातो.

- काही प्रमणात सहमत पहा *१-  काही उदाहरणे

तसेच या पहिल्या पिढीतल्या जोडप्याची मुले नवीन देशात जन्माला येतात. त्याचा भारतीय स्पर्धेशी काहीही संबंध नाही.

- असहमत. अहो, अमेरीकन कंपन्या अमेरीकन नागरीक नाही मीळाला तर किंव्वा कमी पैसे असतील तरच दुसर्या देशातील लोक घेतात..
कंपन्यांना दुसरा कामगार मिळत नाही हे (पेपरवर तरी) दाखवावे लागते!
अमेरीकन नागरीक असेल तर पाहीजे तेव्हा कंपनी काढु किंव्वा घेउ शकते.. ईत्यादी फ़ायदे आहेत.

किमान एक आणि कमाल तीन मुले असे समजले तर एक माणूस परदेशात गेला त्याच्यामागे अडीच ते पाच लोक परदेशात गेल्यासारखे आहे. ज्याचा ताण भारतीय लोकव्यवस्था, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, शिक्षणव्यवस्था आणि अर्थव्यवस्था यांच्यावर पडत नाही.

- असहमत. भारत सरकार मुलांच्या शिक्षणावर, समजावर व ईतर गोश्टींवर नक्कीच खर्च करते.. म्हणजे.. लहानपणाकरता, शिक्षणाकरता भारतात रहायचे आणी जेव्हा शिकुन पुणे झाले की दुसर्या देशाला फ़यदा करुन द्यायचे? हा भारतीय व्यस्थेवर ताण नाही का?

प्रत्येक भारतीय, जो आपल्या देशात धर्माने (आपाप्ल्या) नोकरी - धंदा करतो.. तो देशसेवाच करतो म्हणले तर काय वावगे आहे? वर उदाहरणे दिलीच आहेत..
पोलीस, जो ईमाने आपले काम करतो, शिपाई, जो प्राणपणाने रक्षण करतो.. हे लोक सातत्याने मातृभूमीची सेवा करत असतात..

"काही गोष्टी राजदूत सामान्य लोकांत मिसळून करू शकत नाही ते सामान्य लोक सामान्य लोकांत मिसळून करू शकतात."
- काही प्रामाणांत सहमत. काही ठीकाणी असे पाहीले जाते की, भारतीय लोक सर्वात जास्त उद्दट आहेत. (हा निश्कर्श एका भारतीय मंदिरातील अभ्यासाचे निरिक्षण आहे!)

पहिल्या पिढीतल्या लोकांना शक्य झाले नाही तरी त्यांची दुसरी, तिसरी पिढी राजकीयदृष्ट्या सक्रिय होऊ लागते आणि त्यांनी कितीही नाकारले तरी भारताबद्दल त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी प्रेम असते असे वाटते.
- वर पहा (*१-  काही उदाहरणे )

एखादी भारतीय वंशाची व्यक्ती या सरकारात उच्चपदस्थ सहज होऊ शकते. जे आंतरराष्ट्रीय राजकारणांत भारताचे पारडे जड ठरवू शकेल.
- आशावादी रहण्यास हरकत नाही, पण ह्याचे प्रमाण किती असणार व असे होईलच ह्याची खात्री नाही.

तसेच माझे सामान्य निरीक्षण असे आहे की परदेशात आलेल्या लोकांचे आपल्या देशाबद्दल काहीतरी करण्याची इच्छा जास्ती प्रबळ असते.
- काही प्रामाणांत सहमत आहे.

तसेच भारतात राहून, भारताची लोकसंख्या वाढवून, देशातला पैसा देशातच खेळवून, भारतीय व्यवस्थेवर ताण वाढवून राहणे योग्य कसे तेही सांगावे.
- भारतात राहुन, देशसेवा सुद्दा करता येईल. एक आपत्य आसल्यास लोकसंख्या वाढवण्याचा प्रश्न नाही. तुम्ही जर आपल्या कामाशी प्रामाणीक असाल तर भारतीय व्यवस्थेला मदतच आहे!

ह्याचा अर्थ मी संपुण्र विरोधात आहे असे नाही.
देशप्रेमी अनीवासी भारतीय असले तरी, त्यांची पुढ्ची पीढी देशप्रेमी असेल ह्याची श्क्यता मला फ़ार कमी वाट्ते..

कोणत्याही संतानी परदेशाचे महत्व का सांगीतले नाही? ही सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे.