मोक्याची स्थाने पटकावून त्याचा अत्यंत कल्पकतेने वापर केल्याची ही दोन उदाहरणे मी पाहिली आहेत.
१. न्यू यॉर्कच्या केनेडी विमानतळाच्या इमिग्रेशन (उत्प्रवास की असा काहीतरी सरकारी शब्द आहे नाही?) चौकीजवळ पूर्वी अमेरिकन एक्स्प्रेस कार्डाचे मोठ्ठे होर्डिंग होते. हिरव्या रंगाचे मोठे अ.ए. कार्डच छापले होते. खाली तळटीप होती ... यू डोंट नीड अ विसा इफ यू हॅव अ ग्रीन कार्ड
२. कॅलिफोर्नियात एका महामार्गावरून जाताना ओरॅकल कॉर्पोरेशनच्या इमारती मागे टाकल्यावर पुढे एक जाहिरात वाचल्याचे आठवते. ही जाहिरात सायबेस किंवा तत्सम एखाद्या (तेव्हाच्या) स्पर्धक कंपनीची होती. मजकूर होता ... तुम्ही आताच ओरॅकलला मागे टाकलेत. आम्ही ते केव्हाच केले आहे!