माझ्या मते भारतीयांचे सहज वर्गीकरण करता येणे शक्य आहे,

१) कायमचे भारतातच राहणारे.
२) कुवत, बुद्धिमत्ता, संधी असूनही भारताबाहेर न जाणारे.
३) काहीही करून अमेरिका गाठण्यासाठी धडपडणारे.
४) स्वतःला जाता आले नाही म्हणून गेलेल्यांच्या नावाने बोटे मोडणारे.
५) एकदाचे भारताबाहेर पोचलेले.
६) इतर.

ह्यातला प्रत्येकजण आपापली बाजू "योग्य" मानूनच चालणार. आपण नक्कि कोणत्या वर्गात ते आपले आपण ठरवावे. असो.

एक गोष्ट मात्र जरा विचित्र वाटते. मी २-३ चर्चांमध्ये एक वाक्य पुन्हा-पुन्हा ऐकतोय. "आम्ही देशाला परकीय चलन मिळवून देतो". तेंव्हा काही प्रश्न पडतात,

१) ह्या वाक्यात गर्व आहे की अभिमान ?
२) भारत परकीय चलनावर चालतो का ?
३) भारता ते परकीय चलन पाठवतात, ते भारतासाठी की, स्वतःच्या कुटुंबीयांसाठी ? आणी जर कुटुंबीयांसाठी तर मग त्यात इतका गर्व/अभिमान कसला ?

राहिला प्रश्न देश सेवेचा, त्यासाठी देशातच राहायची काही गरज आहे असे अजिबात वाटत नाही.

मयुरेश वैद्य.