"करीसी भलता शोक वरी ज्ञानही सांगीसी..." हे कृष्णाचे किंकर्तव्यमूढ अर्जुनाला गीता सांगायला सुरवात करताना काढलेले उद्गार वर्षानुवर्षे चालत आलेल्या "परदेशात (म्हणजे फ़क्त अमेरिकेतच बरका!) स्थायीक व्हावे का नाही" या चर्चेत हिरीहिरीने भाग घेणाय्रांबद्द्ल (त्यात आता मीही आलो!) चपखल बसतात असे वाटते. काही माझे आणि काही संक्षिप्तरूपातील इतरांचे) मुद्देः
मला वाटते की नकळत आपण ही चर्चा ही स्वतः घेतलेल्या जेथेकोठे स्थायीक होण्याच्या भुमीकेला इष्ट म्हणून सिध्द करण्याचा खटाटोप वाटतो. माझे काही अनूभवः
पहिल्या अनुभवात न्यूनगंड दिसला तर दुसय्रामधे अहंगंड...विशेष म्हणजे यातील दोन्ही व्यक्ती भारतासाठी काहीच करताना दिसल्या नाहीत अथवा पाट्या टाकण्याच्या कामाव्यतिरीक्त काही समाजोपयोगी करताना दिसल्या नाहीत.
थोडक्यात मला काय जाणवले की आपण कुठे स्थायीक होतोय ह्यापेक्षा कुठ्ल्याही प्रकारचा गंड मनामधे न ठेवता राहून स्वतःसाठी आणि समाजासाठी काम करणे महत्वाचे आहे...त्या विषयावर ("समाजोपयोगी") चर्चा करायला आणि काहीतरी स्वतः करायला तयारी आहेका?
आता शेवटी, परदेशातील भारतीयांनी परत भारतात यावेका?
या विषयावर सुमारे बारा वर्षांपुर्वी अमेरीकेत एका परखड भारतीय सांस्कृतीक नेत्याला एका भारतीयानी मोठा आव आणून विचारले की आम्हाला (NRIs)भारतासाठी इतक्या लांबून काय करता येईल?
त्यावर हा नेता म्हणाला की भारतासाठी जे काही करायचे आहे ते भारतातील लोक करत आहेत - सर्व विचारांचे आणि सर्व पक्षांचे... राहता राहीला तुमचा प्रश्न, जेंव्हा भारतमातेला चांगले दिवस येतील तेंव्हा तुमचे पाय आपोआप इकडे वळतील!