(...वरील कोडे हा दुसरा भाऊ मानल्यास...)

भाषसाहेब,

आपण 'क्रॅकर बॅरल'नामक खाद्यगृहात कधी गेला आहात का?

तेथे जेवण येईपर्यंत वेळ घालवण्यासाठी टेबलावर एक खेळ ठेवलेला असतो. एका त्रिकोणी आकाराच्या बोर्डावर त्रिकोणी 'फॉर्मेशन'मध्ये (मराठी शब्द?) पिना लावलेल्या असतात. (अर्थात यात वरील कोड्याप्रमाणे लाल-निळ्या मेंढ्या किंवा चायनीज चेकर्सप्रमाणे पांढऱ्याकाळ्या सोंगट्या असा प्रकार नाही, कारण हा एकट्याने खेळण्याचा खेळ आहे.) त्रिकोणी फॉर्मेशनमध्ये जितक्या जागा त्यापेक्षा (माझ्या आठवणीप्रमाणे) एक पिन कमी असते.

नियम:
- कोणतीही पिन ही शेजारच्या घरातल्या पिनेच्या डोक्यावरून उडी मारून त्यापलीकडच्या घरात जाऊ शकते. फक्त त्यासाठी ते पलीकडचे घर रिकामे पाहिजे.
- अशी उडी मारताना, ज्या पिनेच्या डोक्यावरून उडी मारायची, ती पिन 'खाऊन टाकली जाते' (खेळातून बाहेर काढली जाते, आणि तिची जागा रिकामी होते).
- पिनांची हालचाल ही फक्त शेजारच्या पिनेच्या डोक्यावरून उडी मारूनच होऊ शकते. (शेजारचे घर रिकामे असल्यास पिन त्या घरात जाऊ शकत नाही. फक्त शेजारच्या घरात दुसरी पिन असेल आणि त्यापलीकडील जागा रिकामी असेल तरच [पहिल्या] पिनेची हालचाल [दुसरी पिन खाऊन टाकून] होऊ शकते.)

उद्दिष्ट:
वरील नियमांचे पालन करून बोर्डावर कमीत कमी पिना शिल्लक ठेवणे. (अर्थात किमान १ पिन तरी नेहमी शिल्लक राहणारच.)

गुणवारी: (नक्की आठवत नाही, पण काहीशी पुढीलप्रमाणे)
१ पिन शिल्लक राहिल्यास: जीनियस.
२ पिना शिल्लक राहिल्यास: तज्ज्ञ (एक्स्पर्ट)
३ पिना शिल्लक राहिल्यास: हुशार
४ किंवा अधिक पिना शिल्लक राहिल्यास: मंद

(एकूण जागा १० की १५ ते नक्की आठवत नाही. बहुधा १५ असाव्यात. १ + २ + ३ + ४ [+ ५?] अशी मांडणी [फॉर्मेशन! सापडला मराठी शब्द!] असते. पिनांची संख्या एकूण जागांपेक्षा एकाने कमी असते.)

(स्वतःचीच) गुणवारी कशीही करा, पण वेळ छान जातो.

- टग्या.

* * * * *
 * * * *
  * * *
   * *
    o

* = पिन.
o = रिकामी जागा.