एक गोष्ट मात्र जरा विचित्र वाटते. मी २-३ चर्चांमध्ये एक वाक्य पुन्हा-पुन्हा ऐकतोय. "आम्ही देशाला परकीय चलन मिळवून देतो".
तेंव्हा काही प्रश्न पडतात,
१) ह्या वाक्यात गर्व आहे की अभिमान ?
२) भारत परकीय चलनावर चालतो का ?
३) भारता ते परकीय चलन पाठवतात, ते भारतासाठी की, स्वतःच्या कुटुंबीयांसाठी ? आणी जर कुटुंबीयांसाठी तर मग त्यात इतका गर्व/अभिमान कसला ?
गर्व किंवा अभिमान असला काय आणि नसला काय...देशात परकीय चलन येते मग ते कुटुंबासाठी येवो अगर मित्रासाठी. हे देशाला सर्वात सहज मिळणारे परकीय चलन असावे असे वाटते.
राहिला प्रश्न देश सेवेचा, त्यासाठी देशातच राहायची काही गरज आहे असे अजिबात वाटत नाही.
सहमत.