अमित,
तुम्ही दिलेली माहीती खूप उपयुक्त आहे. मी मनोगतीना पानसेंचे आहार आणि जीवन हे पुस्तक आणि आहारशास्त्रावरील मालती कारवारकर ची पुस्तकेही वाचायला सांगू इच्छीते.
आहारशास्त्र विचार करण्यासारखे निश्चितच आहे. 'त्यात काय मोठेसे, खायचे काहीतरी. माझी प्रतिकारशक्ती इतकी आहे कि काहीही खाल्ले तरी पचते.' असे आधी निष्काळजीपणे म्हटले जाते. मग 'काहीही' आणि 'अडगळीतील अन्न'(जंक फूड) वेळ वाचवण्यासाठी वर्षानु वर्षे खाऊन केस गळायला लागतात, ३ जिने चढून पण सिंहगड चढल्यासारखा दम लागतो कारण रक्तातील हेमोग्लोबिन पण कमी झालेले असते, त्वचा निस्तेज दिसायला लागते. ३०० रु. चे 'केशर फेशियल' करुन पण आपण पूर्वीसारखे का दिसत नाही याचे आश्चर्य वाटू लागते.. परीणाम किती सांगू?आणि तेव्हा मग अशी माहीती डॉक्टर कडून लठ्ठ सल्ला फी च्या मोबदल्यात उशिरा मिळवली जाते.

माझे या लेखात काही प्रश्न:
१. आहारात आवश्यक जीवनसत्वे आणि ती कशात असतात हे तक्ते मी पाहते, पण रोजच्या आहारातून आणि रोजची मापे(चमचा वाटी) वापरुन किती अन्नातून किती प्रमाणात जीवनसत्वे मिळतात ते सांगणारे तक्ते दुर्मिळ. (सगळे 'इतके ग्रॅम मधे इतके' या स्वरुपात माहीती देतात.) रोजच्याच आहारात सूक्ष्मसे बदल करुन पोषक आहार बनवण्याबद्दल इथे सांगाल का?
२. अनेकदा या पुस्तकांमधे 'काही जीवनसत्वे शिजवल्यास नष्ट होतात, काही वरुन मीठ टाकल्यास नष्ट होतात, काही सूर्यप्रकाशात नष्ट होतात' असे इशारेही असतात. त्याबद्दल पण नीट माहीती द्यावी. कोणते जीवनसत्व कशाने नष्ट होते इ.इ.(मी 'पोषक' म्हणून खात असलेली कुकरमधे शिजवलेल्या आणि बेसन पेरुन केलेल्या मेथीची भाजी खरेच पोषक आहे का मी त्यातली सर्व जीवनसत्वे मारुन लगदा खात आहे??बर्‍याच गृहीणी ही चूक करुन गैरसमजात असतील कि 'आपण जीवनसत्वयुक्त अन्न खात आहोत.')  
 शनिवार रविवारी माहीतीच्या महाजाला वर कमी वेळ असल्याने प्रश्न इथेच संपवत आहे पण अजून काही प्रश्न मनात आहेत. परत कधीतरी.
आपला उपक्रम स्तुत्य आहे.
आपली(आहारशास्त्रवादी)अनु