४. शेवटच्या काही राउंडमधे काही देशी शब्द विचारले. उदा. इज्जत. हा शब्द इंग्रजीत शिरला आहे हे माहीत नव्हते. विजेतीला शेवटून दुसरा शब्द चक्क कुंडलिनी हा होता. म्हणजे योग, अध्यात्माशी संबंधित. हाही शब्द इंग्रजीने घेतला आहे हे माहीत नव्हते.
हो ना!
५. एका स्पर्धक (तेलगू भाषिक) मुलाची आई चक्क साडी नेसून आली होती. हे पाहून बरे वाटले.
खरे आहे!
एकंदर शब्द बघितल्यावर असे वाटते की ह्या स्पर्धेच्या तयारीकरता इंग्रजीखेरीज ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, जर्मन, संस्कृत ह्या सगळ्या भाषांची तोंडओळख करून घ्यावी लागत असेल.
असावी बहुदा!
मराठीत अशी काही स्पर्धा घेता येईल का?
अगदी अशीच स्पर्धा ठेवणे अवघड आहे कारण आपण उच्चाराप्रमाणे 'स्पेलिंग' करतो. जोडाक्षरयुक्त शब्द तसे पाहावे तर मर्यादितच आहेत असे वाटते. थोडा वेगळ्या अंगाने विचार करावा लागेल असे वाटते. वेगळा म्हणजे नक्की कसा ते सध्या तरी माहीत नाही.