टीकारामदादा,

चक्रपाणी,
धन्यवाद. भावना पोचल्या, समजल्या. सहानुभूती आहे. वरील टीकात्मक कवनाची प्रेरणा मला मनोगतावरील भावविव्हल, प्रेमविव्हल फुसक्या लेखनावरून, तसेच काही सर्वस्वी अप्रामाणिक जळकुकड्या 'चोखंदळ' प्रतिसादांवरून, मिळाली.

--- आपल्यासारख्या थोर साहित्यिकास रचनेची प्रेरणा मनोगतावरील भावविव्हळ नि प्रेमविव्हळ, फ़ुसके लेख नि कविता यांतून तसेच काही सर्वस्वी अप्रामाणिक ज़ळकुकड्या प्रतिसादांतून मिळत असेल तर ते तुमचे करंटेपण आणि त्या लेखांचे अहोभाग्य म्हटले पाहिज़े.

ओ, कमॉन :):) चक्रपाणी. हा 'चोखंदळ' प्रतिसाद खरेच मनोरंजक आहे. तुमच्याच शब्दात सांगायचे तर 'बाकी (मला) यात खास काही वाटले नाही.' :):):)
--- ओ, कमॉन टीक्यापंत!  हा 'चोखंदळ' प्रतिसाद खरेच मनोरंजक आहे. तुमच्याच शब्दात सांगायचे तर 'बाकी (मला) यात खास काही वाटले नाही.

हो. नक्कीच. वाईट वाटून घेऊ नका. प्लीज हां!! 
--- छे छे.. अहो वाईट काय वाटून घ्यायचे ! आणि आपल्यासारख्या थोर साहित्यिकाने प्लीज़ म्हटल्यावर तर मला वाईट वाटून घ्यायचा अधिकारच उरत नाही ;)

बाकी तुमचे हे नागपूरचे स्नेही शब्दप्रभू दिसतात.मज़तर्फ़े त्यांना साष्टांग दंडवत (तुम्हीच) घालावा. मला भरून पावल्यासारखे होईल ;)

तुमच्यासारख्या साहित्यक्षेत्रात अल्पावधीतच अधिकारपदावर पोचलेल्या चोखंदळ कवीचे, रसिकाचे प्रतिसाद मला वरचेवर मिळत राहोत, हीच प्रभुचरणी प्रार्थना.

--- कस्सं कस्सं टीकोबा!!! अहो बेज़बाबदार बिनबुडाची विधाने करताना सुद्धा तारतम्य बाळगता येते हे तुम्हीच विसरलात, तर मग बाकीच्यांनी कोणाकडे बघायचे हो?! चोखंदळ काय, अल्पावधीतच अधिकारपदी काय, काहीहीहीहीही.....!!!!!

मनोगतींनो, टीकादादाचा, मी 'चोखंदळ' असल्याचा गैरसमज़ झाला आहे, त्यामुळे दादा पिसाळलाय. वाईट वाटून घेऊ नका, होईल तो शांत. मनोगतावरील चोखंदळ मी नाही, हे यानिमित्ताने जाहीर करून टाकतो. ज्यांना मी मनोगतावरील 'चोखंदळ' ही व्यक्ती असल्याची शंका असेल त्यांनी आपापल्या परीने याची खातरज़मा करावी आणि ज्यांचा तो आरोप असेल त्यांनी तो सप्रमाण सिद्ध करावा
(आवाहक)चक्रपाणि