जुने मराठी संगीत हे निर्विवाद अभिजात आणि अजरामर आहे. पण नावीन्य ही काळाची गरज आहे.  जुन्या गाण्यांच्या बरोबर नव्यामधले जे चांगले आहे त्याची ही प्रशंसा आणि प्रोत्साहन गरजेचे आहे. नाहीतर हिंदी गाण्यांच्या लाटेत नवी मराठी गाणी तग धरू शकणार नाहीत.
सहमत.

या मराठमोळ्या संकेतस्थळावर हिमेश रेशमिया पेक्षा अशा चर्चा जास्त उपयोगी ठरतील.

हिमेशविषयीच्या चर्चेत चांगले आणि वाईट म्हणजे नक्की काय हा मुद्दा समोर आला होता. हिमेशमध्ये वाईट काय असे विचारणारेही मनोगती होतेच. अशांचे प्रबोधन करण्याच्या भानगडीत पडू नये असे मी माझ्या प्रतिसादात म्हटले होते. तथापि जनमानसाचा कौल काय आहे हे कळण्यासाठी अशा चर्चाही आवश्यक आहेत असे वाटते.
सन्जोप राव