तर भारतीय संस्कृतीबद्दल प्रेम असेल तर तसे होण्याची शक्यता जास्त आहे हे सांगण्याकरता ह्याचा उल्लेख केला.
- भारतीय संस्कृतीबद्दल प्रेम हे दुसऱ्या देशात राहुन अशक्य आहे असे वाट्त नाही, पण अवघड नक्की आहे. आपली संस्कृती सुर्या सारखी तेजस्वी आहे. सुर्य प्रकाश पाहीजे तर आपण सुर्याजवळ जावे लागते. सुर्य तुमच्या जवळ येत नाही !
भारतीय संस्कृतीबद्दल प्रेम तयार करायला आपली माणसे दुसऱ्या देशात पाठ्वणे आपल्या संस्कृतीत सुद्दा नाही. मला पटत नाही.
अमेरिकेचे जगातील स्थान, महत्त्व नजीकच्या काळात ढासळेल असे खास वाटत नाही.
- विषयांतर होत असले, तरी सांगावेसे वाटते..
अमेरिकेचे जगातील स्थान, महत्त्व नजीकच्या काळात ढासळेल असे अर्थतज्ञ वारंवार सांगत आले आहेत.. आणि तशी चीन्हे दिसत आहेत..(हा स्वतंत्र वादाचा विषय आहे!)
अमेरिकेतील भारतीय सैन्यात गेले तरी अमेरिका भारताविरुद्ध युद्ध घोषित करण्याची किती शक्यता आहे?
- मुद्दा अमेरिका आणे भारत युद्ध नाही..
मुद्दा हा, की, परदेशी भारतीय राजकारणात जाण्याची श्क्यता फ़ारच नगण्य! मेक्सीको नंतर, भारत नंबर २ चा 'ईमीग्रंट' (मराठी?) आहे. ईतक्या वर्षात किती भारतीय राजकारणात गेले? आणि हि सगळी एवढी लांब प्रक्रियेची वाट पहाणे म्हणजे, भुक लागली असताना धान्य उगवण्याची वाट पहाण्या सारखे आहे.
आपले १० रुपये १०० रुपये वगैरे तुलना मला पटत नाही.
- ते आपले मतभेद आहेत हे मान्य !
चीनमधे हुकुमशाही असल्यामुळे सुधारणा करणे सोपे आहे.
-चीनमधल्या हुकुमशाहीचे फ़ायदे तसेच तोटे आहेत.
भारतातल्या लोकशाहीचे फ़ायदे तसेच तोटे आहेत.
मुद्दा हा, प्रत्येक वेळी, चीनमधल्या हुकुमशाहीचे फ़ायदे सांगुन आपण पळवाट काढ्णे योग्य नाही.. लोकशाहीचे फ़ायदे भारतातल्या लोकांना कसे होईल ते पहावे.. चीनने खुप निऱ्णय कोणत्याही लोकशाहीचे राष्ट्राला घेता येतील असे घेत्ले आहेत. उदाः एक आपत्य असावे. ईत्यादी..