एक ३ अक्षरी अवयव ( हा अवयव तसा तर प्रत्येकाला असतो पण कोणाला राग आल्यास त्या व्यक्तीच्या मते इतरांचा हा अवयव ठिकाणावर नसतो ! ) -

आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - एक वाद्य.
शेवटची दोन अक्षरे उलट्या क्रमाने - एक फळ.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - कापडाचे कपडे बनताना 'हे' पडणारच !

हा अवयव कोणता? :D

एक ४ अक्षरी दैनंदिन वापरातली गोष्ट -

१ले व २रे - घरातून 'हा' बाहेर काढतात.
३०रे व १ले - शुष्क.
१ले व ४थे - एक आडनाव.

दैनंदिन वापरातली ही गोष्ट कोणती?

एक ४ अक्षरी मुलाचे नाव -

१ले व २रे - एका संत व्यक्तीसाठीचे संबोधन.
१ले व ३०रे - गोंडा (?!).
१ले व ४थे - हिंदी सर्वनाम.
२रे व ३०रे - तुरुंग.
२रे व ४थे - कर्म.
३०रे व ४थे - मुलाचे नाव.

मुलाचे नाव कोणते?