आज नवी मराठी गाणी कुठे आहेत?

   नवीन मराठी गाणी (चित्रपट संगीत आणि इतर) जुन्या गाण्यांच्या तुलनेत खूपच मागे आहेत. जुन्या आणि नवीन गाण्यांच्या मध्ये फार मोठी दरी आहे. नवीन संगीत उथळ आणि वरवरचे आहे. खासकरून नवीन चित्रपटातली गाणी तयार करताना कोणी जास्त मेहनत घेत नाही असे दिसते.  ही गाणी चित्रपट चालू असताना एकदाही ऐकाविशी वाटत नाहीत, तर कॅसेट घेणे दूरची गोष्ट.  कानाला गोड लागणारे गाणे तयार होण्यासाठी कविता आणि वाद्ये यापेक्षा अजून काहीतरी लागते याची जाणीव नव्या संगीत/गीत कारांना नाहीये. शिवाय नवीन गाण्यांनी लोकसंगीताची आणि शास्त्रिय संगीताची दोन्हींची साथ सोडली आहे. मग त्या गाण्यांचा कसा टिकाव लागणार? (जुन्या "अभिजात" मराठी गाण्यांनी या दोन्ही बाजू ताकदीने पेलल्या होत्या/आहेत) 
हिंदी गाण्यांची व त्यातल्या संगीताची नक्कल करण्यामुळे असे झाले असावे.

आज आपल्यापैकी कितीजण 'नवीन' मराठी गाण्यांच्या ध्वनिफीती विकत घेतात?

जे आवडेल आणि पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटेल तेच माणूस विकत घेणार.  नवीन मराठी गाणी कायम स्वरूपी संग्रही ठेवण्यासारखी नाहीयेत असे मला वाटते.
आजही अजरामर गाणीच जास्त लोकप्रिय आहेत. (कॅसेट स्वरूपात आणि कार्यक्रम स्वरूपातही.) प्रोत्साहन देण्याबाबत सहमत. पण याचा अर्थ कुठलीही गाणी आवडू शकत नाहीत हो !

जुने ते सोने, नवीन सोन्याचा शोध अजून लागला नाही , त्यामुळे जुने सोनेच घेणे भाग आहे...

--मेघदूत