आहो केंब्रिज-ला आज ( ३ जून शनिवार रोजी) स्ट्रॉबेरी महोस्तव झाला, कोणी गेले होते का? मी आमच्या चमू सोबत गेलो होतो. तसं स्ट्रॉबेरी महोस्तव ह्या नावावर जाऊ नका , मला तरी तिथे स्ट्रॉबेरी चे असे काही दिसले नाही पण हा, लोकांना ( पिण्या साठी का होईना) एकत्र येण्याचा एक कार्यक्रम होता, आपल्या कडील जत्रे सारखाच प्रकार होता, जमल्यास फोटो अप-लोड करेनच. आणि हो आता इकडे आशे बरेच कार्यक्रम आयोजित होत असतात, आपल्या भागातील माहिती जरूर कळवा.