आपण एखाद्या व्यक्तिला / गोष्टीला / कपड्याला आपल्यासाठी लकी किंवा अनलकी मानतो. एखाद्या वाईट घटनेच्या आधीचा घटनाक्रम आपल्या विशेष लक्षात रहातो, योगायोगाने असं होतं की तसाच घटनाक्रम आणि अजून एक वाईट घटना मग आपण त्या घटनाक्रमाला आपल्यासाठी अशुभ मानू लागतो आणि मग त्या क्रमाने गोष्टी घडू नयेत म्हणून आपण खबरदारी घेतो. यात घटनाक्रम म्हणजे.. गावाला चुलतबहिणीच्या लग्नाला गेले होते रिझल्टसाठी लवकर परत आले तर माझा परिक्षेचा रिझल्ट आला होता आणि मी नापास झाले होते. म्हणजे यापुढे बहिणींची लग्ने रिझल्टच्या वेळेला असतील तर मी जाणे टाळलेले बरे. असे मी आपल्याच मनात ठरवते. म्हणजे मला माहित असतं पेपर वाईट गेले होते. पण काठावर का होईना पास होण्याची खात्री होती पण थोडक्यासाठी हुकलं.. ते थोडकं हुकणं बहिणीच्या लग्नाच्या माथी..
कदाचित वरील अनेक इल्लॉजिकल समजूतींविषयी असेच काही घडले असेल का?