नमस्कार अवधूतजी, हा विषय चर्चेला घेतल्याखातर धन्यवाद.

गुणवत्ता यादी अगदी शेवटच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यापर्यंत अवश्य प्रकाशित करावी.
त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि लोकांना आपापली नक्की स्थिती स्पष्ट होते.

मात्र, त्याचे आधारे गुणगौरव करू नये. गुणगौरवाचे निकष वेगळे असावेत.
ते परिक्षाफलावर आधारित नसून शाळेतील वर्षभरातील गुणनिष्कर्षांवर आधारित असावेत. म्हणजे सातत्याला महत्त्व प्राप्त होईल. परीक्षांवरील भर ओसरेल.