चर्चा न होता चर्चेत विजय मिळवल्याचा वृथा अभिमान सदर माणसाला मिळतो.
- येथे, दुसऱ्या माणसाचे मत वाचुन उत्तर द्द्या वे लागते, म्हणुन आपले म्हणणे अतिरेकी वाटते. तसेच, माझ्या मते, येथे लोक आपाअपला विचार मांडतात व विचारातील मतभेद व्यक्त करतात. अभिमान, विजय वगैरे हे तुमच्या मनाचे खेळ आहेत.
या चर्चेतही मीच काय तो बरोबर असा अनुभव येत आहे. दुसऱ्या बाजूचे म्हणणे ऐकून त्यावर विचार करणे वगैरे दूरच राहीले.
- दुसऱ्यां चे मतही तुमच्या बद्दल असेच असु शकते
१. स्वदेशस्थ भारतीय परदेशस्थ भारतीयांबद्दल किती आपुलकी दाखवतात?
- माझा अनुभव खुप चांगला आहे. माझ्या मते, हे माणसावर आहे. ईतकेच नाहि, तर, भारत सरकार सुद्धा, प्रोत्साहन देते. (उदाः घर, जागा ख्ररेदीवर कर नाही) कित्येक कंपन्या (माझा स्वताचा अनुभव) भारतात परत येण्यास मदत, प्रोत्साहन देतात. ही उदाहरणे खुप आहेत.. आपली द्रुष्टी उघडी मात्र पाहिजे..
२. NRIना नॉट रिक्वायर्ड इंडीयन्स म्हणले जाते. अश्या प्रकारे हिणवल्या जाणाऱ्या लोकांकडून स्वदेशस्थ भारतीयांनी अपेक्षा ठेवणे योग्य कसे?
- कोणिही कोणाला हिणवणे योग्य नाहि. NRIना हिणवणे योग्य नाही. काही भारतीयांना NRI कडुन चांगले अनुभव नासल्याने असे होते. तुम्हाला हिणवणे आठ्वते, पण आपले राजेकिय नेते जे चार चांगले शब्द बोलतात ते आठवते का?
३. परदेशस्थ स्वतःहून परदेशी जातात. तेंव्हा तुम्ही कुठे राहावे हे सांगायला येतात का? मग देशस्थ भारतीयांनी परदेशस्थ लोकांना कुठे राहा, काय करा हे सांगण्याचा काय अधिकार आहे?
- हे आपआपले मत मांडण्याचे व्यासपिठ आहे.
४. स्वदेशस्थ भारतीय भारतात राहून अशी काय महान देशसेवा करतात की ज्यांनी परदेशस्थ भारतीयांना अमके करा- तमके करा असा उपदेश करावा?
- मला ही पळवाट वाटते. हे वाक्य ईतर सर्व देशांना सुद्दा लागु आहे.
तसेच, NRIनी उक्रुष्ट देशप्रेमा चे उदाहरण घालुन दिले तर ?
माझ्याकडे उत्तम स्वदेशस्थ भारतीयांची खुप उदाहणे आहेत. कित्येक स्वंयसेवी संस्था, समाजक सेवक, कुटुंबे आहेत.
५. तसेही देशसेवा किती आणि कशी हा म्हणावे तर ऐच्छिक मुद्दा आहे असे वाटते.
- स्वार्थी द्रुष्टी ने पाहिले तर, हा ऐच्छिक मुद्दा आहे नाहीतर हा राष्ट्रीय मुद्दा आहे.
आपल्या धर्मीत सुद्धा देशसेवेचे महत्व आहे. श्रीराम जेव्हा वनवासात जातो, तेव्हा, आयोध्येची माती घेउन दररोज त्याची पुजा करायचा..मला कल्पना आहे, हायुक्तीवाद होणार की "तो राम होता, मी नाही!". पण श्रीरामाने उत्क्रुष्ट पुरुषाचे उदाहरण घालुन दिले आहे!
ही चर्चा बंद करत आहे.
- आभार. चचेत आपला अपमान करण्याचा हेतु नव्हता.