श्री गणेशाय नमः ॥
श्री गणेशा मीच करावा म्हणतो...
ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति ।
भुङ्क्ते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणम् ॥
प्रेम म्हणजे काय, ते कसं ओळखावं, या प्रश्नाचं उत्तर देताना कवी म्हणतो-
अर्थ:
माणूस (ज्याच्या/जिच्यावर प्रेम करतो त्याला काहीतरी) देतो, (त्याने/तिने काही दिलं तर) घेतो, (त्याला/तिला) आपलं गुपित सांगतो, (त्याचं/तिचं) गुपित विचारतो, (त्याच्या/तिच्याकडे) जेवतो, (त्याला/तिला) जेवू घालतो. या सहा प्रकारांनी प्रेम ओळखता येतं.
संदर्भ-
शिदोरी सार्थ सुभाषितांची
डॉ. सरोजा भाटे
वरदा प्रकाशन
प्रथम आवृत्ती