'सगळी सुखी माणसे एकाच पद्धतीने सुखी असतात, पण प्रत्येक दुःखी माणसाच्या दुःखाचे तऱ्हा वेगळी असते' या अर्थाचे टॉलस्टॉयचे वाक्य

टॉलस्टॉय साहेबांच्या वरील वाक्याशी मी सहमत नाही.  

मूळ वाक्य 'ऑल हॅपी फॅमीलीज आर अलाइक, बट इच अनहॅपी फॅमिली इज अनहॅपी इन इटस ओन वे' असे आहे. जरासा विचार केला तर हे पटण्यासारखे आहे. सुखाचेही बारीकबारीक पदर असतात, नाही असे नाही. पण सुखी कुटुंबातील सुख ही एक सर्वव्यापी, सर्वसमावेशक भावना असते. येथे आपण सुखी कुटुंब म्हणजे ज्यातले सर्व सदस्य लौकिकार्थाने सुखी आहेत ते, असे गृहीत धरले आहे. दुःखाचे तसे नाही. दुःख हे अतिशय गुंतागुंतीची, जटील भावना आहे. प्रत्येकाचे दुःख हे वैयक्तिक, खाजगी आणि इतरांपेक्षा अगदी वेगळे असू शकते. त्यामुळे टॉलस्टॉयचे वाक्य पटायला हरकत नाही.

जी.ए. लग्नाला उपस्थित रहाण्याचा प्रश्नच नव्हता.

का बरं?

यासाठी बाकी जी.एं. चे व्यक्तीमत्व जवळून तपासायला हवे. सर्वसामान्यांप्रमाणेच जी.एं. च्या मनात असंख्य पूर्वगृह, गंड होते. काहीकाही बाबतीत ते विक्षिप्त म्हणता येईल इतके चमत्कारिक होते. त्यांची जवळची माणसेही त्यामुळे वैतागत असत. आपण बाकी इथे ते व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून सोडून देऊया.