प्रथम एकही अभिप्राय नव्हता, म्हणून वाटले की कोणालाच यात रस दिसत नाही, आपण उगाच एवढं सगळं केलं का काय ... ...म्हणलं चला निदान मराठीत आणि एकत्रित स्वरुपात माहिती देण्याचं श्रेय तरी घ्यावं.

तुम्ही लेख लिहिला पण दोन दिवस तो चुकून अप्रकाशितच ठेवला होता! अप्रकाशित लेख तुम्ही आणि प्रशासक ह्यांव्यतिरिक्त कोणालाही दिसत नाही.

तुम्ही लेख नक्कीच अतिशय परिश्रमपूर्वक लिहिलेला आहे. मूळ विषयाचे वाचन, (त्याचे भाषांतर, रूपांतर?) आणि एचटीएमएल चे टेबल वगैरे बनवण्याचे अतिशय किचकट काम तुम्ही न कंटाळता केलेले दिसते.

असेच अनेकानेक शास्त्रीय विषयांवर मराठीत लेखन करून असे 'देखणे' लेख येथे निर्माण करीत जा, असे सांगावेसे वाटते.