विश्वमोहिनी तुमचे म्हणणे बरोबर आहे.
यास्मिन शेख यांच्यानुसार इथे दिलेले शब्द प्रमाणित असावेत.
इतर पर्याय बोलीभाषेतील वापरामुळेच आपणास ज्ञात असावेत.
मात्र मराठी विकास संस्थेची संस्तुती इथे दिलेल्या शब्दांना असावी असे वाटते.

राज्य मराठी विकास संस्थेने प्रसिद्ध केलेल्या यास्मिन शेख लिखित 'मराठी लेखन मार्गदर्शिका' ह्या पुस्तकाच्या शेवटी दिलेली हे योग्य शब्दांची यादी येथे क्रमाक्रमाने उतरवून कायमच्या शुद्धलेखनाच्या संदर्भासाठी टेवण्याचा उद्देश आहे. सुमारे ६५ पाने आहेत.

अशी सुरूवात महेश यांनी केलेली आहे. मात्र या ६५ पानांच्या सुरूवातीस त्यांच्या वापराबाबत जर काही टिप्पणी यास्मिन शेख यांनी दिलेली असेल तर त्यात कदाचित ह्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.