तोंडलीभात उर्फ उंडरूराईस एकदम झकास !

मी ऑफीसमध्ये जेव्हा पुरूष-सहकाऱ्यांची पाककृती स्पर्धा आयोजित केली होती ( ज्या स्पर्धेची न्यायाधीश अर्थातच मी होते ! :D ).. तेव्हा त्या स्पर्धेत दुसरे विजेतेपद 'उंडरूराईस' या पाककृतीलाच मिळाले होते. त्या दिवशीपर्यंत हा पदार्थ मला अजिबात आवडत नव्हता, पण आता खूप आवडतो. ब्रह्मय्याने खूपच सुंदर चव केली होती !