मंदार,

माझ्या लेखातले योग्य वाक्य तुम्ही उधृत केले आहे.

सर्व आघाडीचे संगीतकार हे शास्त्रीय संगीत स्वतः शिकले आहेत किंवा त्यांना त्याची पूर्ण माहिती आहे

त्यापैकी दुसरा भाग खूपच महत्वाचा आहे.  आपल्या भारतीय कानांना (Ears) रागसंगीत इतके नकळत माहिती आहे कि आपल्याला त्याची कल्पनाच येत नाही.  सिंगितकार जरी मुद्दामहून शास्त्रीय संगीत शिकले नसले तरी त्यांना राग समजतात.  अर्थात कुठल्याहि नियमाला अपवाद असणारच.

आणखी एक मुद्दा मी मांडू इच्छितो.  जसे रागावर आधारित गाणी असतात तसेच गाण्यांवर आधारित राग असतात.  थांबा बिचकून जाऊ नका.  पहाडी, झिंजोटी, पिलू यासारखे कितीतरी राग हे मुळात लोकसंगितातल्या चालींवरून बांधले गेले आहेत.

तिलकश्याम हा राग पं. रविशंकर यांनी तिलककामोद आणि श्यामकल्याण या दोन रागांच्या मिलाफातून केला.  पण ते कोणाच्या लक्षात राहील?  पण त्यांनीच त्या रागावर आधारित रचलेले अनुराधा या चित्रपटातले "जाने कैसे सपनोमे" हे मात्र बहुतेकांना माहिती आहे.  त्यामुळे तिलकश्यामची ओळख म्हणजे "जाने कैसे सपनोमे" या गाण्याचा राग अशीच जास्त योग्य ठरेल.

कलोअ,
सुभाष