विषय निघाला म्हणून - आपल्या कडील बऱ्याचं लोकांना ( आणि लंडनला येण्या आधी मला पण) लंडन ब्रिज/टॉवर ब्रिज वेगळे आहेत हे माहीत नसते. आपण चित्रात/चित्रपटा पाहतो तो मोठा आणि मृदुलांनी सांगितल्या प्रमाणे उघड-बंद होणारा पुल आहे तो "लंडनचा टॉवरब्रिज"आहे. तो लंडन - टॉवर ( जिथे आपला कोहिनुर ठेवला आहे तो राजवाडा) शेजारी आहे. पण खरा लंडन ब्रिज हा त्या-च्याच पुढे आहे. लंडन ब्रिज वरून टॉवर ब्रिज-चे दृश्य खूपच सुंदर दिसते. रात्रीची (शनि/रवी) दिव्यांची रोषणाई पण सुंदर असते.

मृदूला तुम्ही "ग्रीन-विच" ते वेस्टमिनिस्टर हा बोटीचा प्रवास केलात का? करा सुंदर आहे करा. इथे आपल्याला इंग्लंड मधील प्रेक्षणीय स्थळांची चर्चा करता येईल.. लोकहो ( आता असे किती जण आहेत म्हणा इथे ः) ) काय मत आहे?