ह्या प्रकारात बरेच काळेबेरे असावे असे वाटते. एक दिवस रक्तात अमली पदार्थ नसल्याची बातमी तर दुसऱ्या दिवशी लघवीत कोकेन सापडल्याची.
बहुधा कुठूनतरी पहिला हप्ता व्यवस्थित पोचल्यामुळे रक्तातील अमली पदार्थ गायब झाले पण नंतर अळंटळं झाले म्हणून लघवीत सापडले असावे! पुढचा हप्ता वेळेत पोचल्यास चाचण्यांत चूक झाल्याचे कळले तर आश्चर्य नको.
द. मा. मिरासदारांची पंचनामा नावाची कथा आठवली. एकाच्या शेतात गांजाचे झाड सापडते त्याचा पंचनामा करायचा असतो. तर योग्य तो मलिदा चारून त्याची उंची दहा फुटावरुन टप्प्याटप्प्याने काही इंचावर येते आणि शेवटी ते झाड नाहीच असा निष्कर्ष निघतो.
असला प्रकार चालू आहे. हसावे का संतापावे ते कळेनासे झाले आहे.
असला नग धडाडीचा युवानेता म्हणून भाजपमधे भरती झाला आणि वरती आणला गेला तर मी भाजपला आयुष्यात मत देणार नाही.