एक पुस्तक असून त्यावर ४ जुलै १७७६ लिहिले आहे.
या दिवशी अमेरिकी स्वातंत्र्याचा जाहीरनामा अमेरिकेने स्वीकृत केला. (थॉमस जेफरसनला ४ जुलैलाच मृत्यू यावा हा योगायोग म्हणावा का?)
ऑक्साइडचा थर खरवडून काढून पुतळ्याला पूर्वीची झळाळी प्राप्त करून देण्यासाठी हा धनवान देश काहीच का करत नाही,
हे ऑक्साइड नाही क्लोराइड आहे. क्युप्रिक क्लोराइड. याचा रंग निळसर-हिरवा असतो. समुद्रकिनारी असल्याने तांब्याला क्लोरीनचा संसर्ग होऊन हे क्युप्रिक क्लोराइड तयार होते.
४६मी उंचीच्या या पुतळ्यावरून हा थर काढण्यासाठी किती कष्ट करावे लागतील याचा अंदाज करा. तसेच थर काढला तरी परत हे क्युप्रिक क्लोराइड तयार होणारच. तसेच असा थर मूळ धातूचे नवीन संसर्गापासून रक्षण करतो. पर्यायाने हा थर आहे तसाच ठेवणे शहाणपणाचे ठरावे!
(विनायकराव अधिक प्रकाश टाकू शकतील असे वाटते.)
कामाकुरा दाईबुत्सु
याच कारणाने हिरवट दिसतो. अर्थात हा पुतळा ब्राँझ चा आहे.
शिवाजीमहाराजांनासुद्धा त्यांचे गडकिल्ले या जागेइतके स्वच्छ आणि त्यामुळेच सर्वार्थाने पवित्र राहिलेले नक्कीच आवडले असते.
सहमत.