सन्जोप राव,

तुम्ही सुंदर वर्णन केले आहे. मी यातील "पाडस"वाचले आहे.

कथा तर सुंदरच आहे.

ज्योडीचा एकुलता एक मित्र फॉडरविंग, त्याने पाळलेले प्राणी ,त्याच्या कपोलकल्पित गोष्टी,इतर फॉरेस्टर कुटुंब, हुतो आजी,ज्योडीचे एकटेपण,फ्लॅगबद्दलच्या त्याच्या भावना यांचे वर्णन सुंदर आहे.

"फ्लॅगवर जेवढे प्रेम केले तेवढे जगातील कुठल्याही स्त्री-पुरुषावर सोडाच पोटच्या पोरावरही करु शकणार नाही" याची ज्योडीला झालेली जाणीव आणी "त्याच्या स्वप्नाच्या दुनियेत एक कोवळा पोरगा आणि त्याचं पाडस पळत पळत येतात आणि झाडामागं दिसेनासे होतात.."

डोळे ओलावणारा,वास्तवाची जाणीव करुन देणारा शेवट..

हरिणबालक वाचायचे आहे.

-प्राजक्ती