एकतरी नीलाक्षी आहे हे गृहीतक आहेच! पण ते असेल तर सर्वच जणी नीलाक्षी आहेत ही सिद्धता आहे. गृहीतक धरण्यामध्ये चूक किंवा फसवणूक नाही.
सिद्धता "घोळक्यातील एका मुलीचे डोळे निळे असतील तर सर्वच जणींचे डोळे निळे असतील." या नियमाची द्यायची आहे.
त्यामुळे "य + १" युवतींच्या घोळक्यात जर १ नीलाक्षी असेल तर सर्वच जणी नीलाक्षी असतील हे सिद्ध करणे आले. एकही नीलाक्षी नसेल तर सिद्धता नाहीच, पण त्याने विरोधाभास होत नाही!
लावायचाच झाला तर टग्यांचा दावा पायरी १ साठीही लावता येईल! पण तो योग्य नाही!! पायरी १ ची सोपी सिद्धता ही अशी - घोळक्यातील एक युवती नीलाक्षी असेल तर सर्वच जणी नीलाक्षी असतील. पण सर्वजणी म्हणजे ती एकटीच आहे की जी नीलाक्षी आहे हे माहीत आहे.
वरील सिद्धता सर्व पूर्णांकांसाठी सिद्ध झाली असे मानले की तमाम जगासाठी असा नियम होतो - जगातील एकातरी मुलीचे डोळे निळे असतील तर सर्वच जणींचे डोळे निळे असतील. म्हणजे जगात केवळ एक नीलाक्षी आहे हे दाखविणे पुरेसे आहे. त्यासाठीच ऐश्वर्याचे छायाचित्र जोडून दिले आहे.
टगेराव आणि इतरही - वरील विधानांत काही गफलत राहिली असल्यास कळवावे. दुरुस्तीस नेहमीच तयार!!