वेदश्री, प्रवासीराव, विजय राव, अनु,
आपला सर्वांचा आभारी आहे.
प्रवासीरावांचे "आधुनिक आहारशास्त्र वाचताना आपण थोडेसे सावध राहिले पाहिजे." हे म्हणणे बरोबर आहे. एखादी गोष्ट ऐकल्यावर आपल्या अनुभवाप्रमाणे, त्यातील किती घ्यावयाचे हे ठरवले पाहिजे. शेवटी प्रत्येक माणसाच्या शरीराची जडणघडण निराळी असते. ती ओळखावयास शिकणे ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे.
अनु, मी माझ्या लेखात लिहील्याप्रमाणे, मी या विषयातील तज्ञ नाही. एक संग्राहक या नात्याने वरील माहीती मी दिली आहे. परंतु आपणास जे प्रश्न पडले आहेत, ते निश्चितच मलाही पडले आहेत, आणि सद्ध्या त्यावर मी वाचन करीतच आहे. मला काही उपयुक्त माहीती आढळली तर मी नक्कीच इथे देईन.
इतर जाणकार मनोगतींचे सल्ले/विचार/अनुभव ऐकणे हाही माझ्या या लेखाचा छुपा उद्देश (hidden agenda) आहे. :-)
(नम्र) अमित चितळे