संदीप,

इंग्रजी अक्षररचनेनुसार बिजींग असे दिसले तरी उच्चात पैचिंग असा आहे. पेइ म्हणजे उत्तर दिशा, चिंग म्हणजे तलवार वा परजलेले हत्यार. उत्तर सीमेचे रक्षण करणारे या अर्थाने पैचिंग असे नाव पडले.  मीही पेकिंग, बेजिंग, बिजिंग वगरे बरेच उच्चार ऐकले होते. एकदा शांघायला असताना अचानक आठवण झाली, मग जेनीला नक्की उच्चार काय ते विचारले. तीने मान वेळावत 'पेइ‌‌ऽऽऽचिंग़' असे मस्तपैकी गाऊन दाखवले. त्या उच्चार शैलीची खूप गंमत वाटली.

पुन्हा आपल्याशी साम्य आले - उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू....