मित्रांनो,

छान लेख आहेत ईथे. अनु आपण चांगला विषय उचलला आहे. माझा अनूभव पण असाच आहे काहीतरी. सध्या मी वौकेषा ला काम करीत आहे. इथे जीतके तामीळ लोक आहेत जवळ्पास तेवढेच मराठी आहेत. आमच्या चमूत एक तामीळ आहे. तो पण कधीच हिंदी बोलत नाही. मला तीन महीन्यां मध्ये आठवत नाही की एकदा तरी हिंदीत बोललो असेल मी त्याच्यासोबत!! दूष्काळात तेरावा महीना म्हणून एक तामीळ मूलगी आली आता. एकदा काही चर्चेत हिंदीत बोलणे चालू झाले, थोड्या वेळेनी मी तीला वीचारले तीचं मत, चक्क म्हणाली मला हिंदी येत नाही. आम्ही सगळे एकमेकांकडे बघू लागलो!!

पण एक अजून चांगली गोष्ट की महाराष्ट्र मंडळ मात्र जोरदार आहे. कार्यक्रम होत राहतात. काही दिवस आधी 'श्वास' दाखवला. ईथे एक देऊळ आहे. तळ्घरात मोठ्ठा हॉल आहे, तीथेच दाखवला. मग मस्त जेवणाचा कार्यक्रम होता. सांगण्याचे तात्पर्य हे की मराठी लोकं अजूनही मराठी व हिंदी चा आदर करतात!! तामीळ लोकं कधीच ती पातळी गाठू शकत नाही.

जय महाराष्ट्र!!