माझ्या त्रोटक लेखनाविषयीची माहिती अशी --: 'का. स. वाणी प्रगत मराठी अध्ययन संस्था, धुळे ' या संस्थेच्या कथालेखनस्पर्धेत १९९८ मध्ये "नियतकर्म" या कथेला विभागून प्रथम पारितोषिक मिळाले आहे. समाधान याचे की विभागून मिळालेले हे पारितोषिक साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळविलेल्या लेखिका डॉ. हेमा जावडेकर (दिल्ली )यांच्या बरोबर मिळाले. प्रा. भास्कर चंदनशीव परीक्षक होते. त्याच संस्थेने आपल्या 'आमची श्रीवाणी' या नियतकालिकात आम्हां दोघांची कथा प्रसिद्ध केली. [माझ्या या कथेचा विषय श्रीकृष्णाच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या जरा नावाच्या पारध्यासंदर्भात आहे.]
एप्रिल २००० च्या 'वसंत' मासिकात आणखी एक कथा ("परीस")प्रसिद्ध झाली आहे.
अजून काही कथा हळूहळू प्रसिद्ध करण्याचा विचार आहे.
काही बाळबोध कविता ' नवोदित' या प्रातिनिधिक कवितासंग्रहात समाविष्ट झाल्या आहेत.
पुणे येथे झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या काव्यवाचनात सहभाग घेतला.
धन्यवाद.
अवधूत