मी केवळ गुणवत्ता यादी असावी का असे विचारले होते. त्या वेळी श्रेणी पद्धतीचा विचार होईल असे वाटले नव्हते. पण आजच्याच सकाळच्या अंकात श्रेणी पद्धतीचा वापर पुढील वर्षापासून करण्याचे संकेत दिले गेले आहेत. आता गुणवत्ता यादीबरोबर श्रेणी पद्धतीवरही चर्चा करू या. श्रेणी पद्धती चांगली की गुण पद्धती चांगली ? विषयात जरा विस्तार होईल, एवढेच. ग्रेडेशन विषयीची दि.६/६/२००६च्या सकाळ( पुणे आवृत्ती)मधली मुख्य पानावरची ही बातमी पहा.
धन्यवाद.
अवधूत.