मृदुला - वाचनांस हजेरी लावल्याबद्दल धन्यवाद!
मजा आली वाचून.
वा! लिहिण्याचे सार्थक झाले... मला स्वतःलाही हे गणित पहिल्यांदा पाहिले तेंव्हा असाच आनंद झाला होता!
न = "य" साठी नियम सिद्ध होतो असे मानून त्याआधारे न = "य + १"
असे थेट मानणे बरे नाही.. ;-)
हे नेमके कळले नाही!! सर्व पूर्णांकांसाठी एखादा नियम सिद्ध करण्यासाठी ही पद्धत योग्य वाटते.
उदा. पहिल्या न पूर्णांकांची बेरीज न(न+१)/२ येते. याची सिद्धता. वगैरे वगैरे!!
चित्रांसह दिली असती तर आणखी मजा आली असती.
हे सुचले नाही... पुढच्या गणितात नक्की प्रयत्न करेन! गोडी अपूर्णतेची...
न=१ च्या सिद्धतेतच घोटाळा आहे.
कसे काय? न = १ तर अगदी trivial वाटते!!
(आणि तसेही ऐश्वर्याचे डोळे राखी रंगाचे आहेत!)
हे मान्य! पण गणितासाठी निळे मानून घेतले आहेत... हा हा हा!! तसेच सौंदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यांत असते हा काव्यात्मक न्यायही सोयीस्कर लावला आहेच!!
चूभूद्याघ्या... काही राहिले असल्यास मृदुला किंवा अन्य मनोगतींनी जरूर पूर्ण करावे... वा कळवावे... पुन्हा प्रयत्न करीन!