मराठी मातृभाषिकांनी अंतर्मुख होउन सजग होण्याची आणि तुटकपणा टाकून देउन 'माणसांत' येण्याची गरज आहे यात शंकाच नाही. लेखात काही मुद्द्यांवर अतिशय मार्मिक भाष्य केले आहे.
परंतु, आम्हा मराठी जनांस कायम अन्यभाषिकांकडून 'आता तरी सुधारा' पर उपदेशाचे डोस किती दिवस ऐकून घ्यावे लागणार आहेत? परप्रांतात वास्तव्य करणार्या / केलेल्या मराठी भाषिकांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारावर तेथील समाजाबद्दल जर असे मतप्रदर्शन केले तर ते किती 'रॅशनली' ऐकून घेतले जाईल याची कल्पनाच केलेली बरी!
मराठी माणसांच्या 'कथित तुटकपणा'बद्दल टाहो फोडणारी अ-मराठी जनता वर्षानुवर्षे महाराष्ट्रात राहून मराठी जीवनप्रवाहापासून किती फटकून रहाते त्याबद्दल कोणी काहीही कधीच का लिहित नाही?
असो. लेखांत वर्णन केलेली मते वाचून सुज्ञ आणि बुद्धिमान मनोगतींनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे हीच अपेक्षा.