प्रिय अमित,
लेख परिश्रमपूर्वक लिहिला आहेस ह्याबद्दल दुमत नाही.पण एक त्रुटी जाणवते ती अशी की जी जीवनसत्वे तू लिहिली आहेस ती फक्त शाकाहारी पदार्थांतूनच मिळतात असे वाटते तुझा तक्ता पाहून.
मग मांसाहारी लोकांनी करायचे काय? शाकाहाराला प्रोत्साहन देणार तू:))
की मांसाहारातून फक्त प्रथिनेच मिळवायची!
vit A हे दातांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.पण ते फक्त आईच्या गर्भात असतांनाच. जन्मल्यानंतर दात फक्त तोंडात दिसतात.पण त्याची development आधीच झालेली असते.मग त्यात काही फरक पडत नाही.
माझी पुस्तके परत चाळावी लागतील बहुधा. माझ्या अभ्यासक्रमात गरीबातील गरीबालाही शरीरसंवर्धनासाठी आणि रोगप्रतिकारासाठी आवश्यक घटक कसे मिळतील हे शिकविले जायचे.
अर्थात हे मी हौस म्हणून केले होते.प्रोजेक्ट संपला आणि मग तेही विसरलो.