मराठी माणसाने मद्राशांनी हिंदी शिकावी असे म्हणणे हे शेपुट तुटक्या कोल्ह्याच्या उपदेशा सारखे आहे. बाबा मद्राशा, मी माझी भाषा गुण्डाळून् ईतर भाषा बोलतो, रस्त्यात मित्र भेटला तरी आवर्जुन म्हणतो , 'किधर है यार?', तसेच तुही तुझा भाषाभिमान बासनात बांध आणि इतर भाषेत बोल.

एक नेहेमिचा प्रश्न. इन्ग्रजी का चालते आपल्याला? उत्तर सरळ आहे - उष्टे खायचे तर निदान तुपाच्या लालचेने खावे. आपली भाषा सोडुन परकी भाषा शिकाची तर जी फ़ायद्याची तिच शिकावी. आणि इतर भाषा कामासाठी शिकणे यात गैर काय? कष्टाने परकी भाषा शिकाची तर ती हिंदी कशाला? काय उपयोग आहे? चित्रपट पहायला हिंदी शिकावी लागत नाही, तो टीपी असतो. लोक समजत नसताना इन्ग्रजी चित्रपट पहातातच ना?

हिंदी भाषेची गोडी न वाटता काहीसा तिरस्कार वाटतो तो हिंदी भाषीकांच्या आढ्यताखोर वर्तना मुळे. आम्ही श्रेश्ठ, आम्ही शहाणे, आम्ही राज्यकर्ते, आणि इतर भाषीक हे आमचे मांडलिक असा एकुण आवीर्भाव असतो. चाचा नेहेरु आणि त्यांचे पित्ते हिंदी भाषीक म्हणून सगळ्या देशाने हिंदीचा राष्ट्राभाषा म्हणून स्विकार करावा असा दुराग्रह का? आता लोकसंख्येचे भाषावर प्रमाण मोजून राष्ट्रभाषा ठरवाची तर प्रश्न असा, कि ४७ साली किती युपी/ एम्पी /बिहार वाले साक्षर होते? (आज तरी किती हा प्रश्नच आहे) पुन्हा यात शुद्ध हिंदी वाले किती आणि भोजपुरी सारख्या पोटभषा बोलणारे किती ?

मद्राशी लोक फ़ार व्यवहारी आहेत. ते मुंबईत असताना बेश हिंदी बोलतात पण ती गरज त्यांच्या राज्यात वा परदेशात नसल्यामुळे ते ताबडतोब स्थलकालानुसार ती जाणतात आणि विसरतातही. दुसर्‍या भाषीकाला तिसरी भाषा शिकाचा आग्रह धरण्यापेक्षा आपण आपली भाषा अधिक लोकप्रिय आणि सम्रुद्ध करण्यासाठी प्रयत्न करावा असे माहे कळक्ळीचे मत आहे. मी मल्लु पासून ते च्युंगक्वोरन पर्यंत भेटलेल्या प्रत्येक व्यक्तिला त्याच्या भाषेतला एखादा शब्द बोलुन सुखावायचा प्रयत्न करतो त्याचबरोबर त्यालाही माझ्या मायमराठीतले चार दोन शब्द आवर्जून शिकवतो, आणि तेदेखील ते शब्द माझ्याशी बोलताना अवश्य वापरतात.