या विषयावर 'मनोगत' मध्ये चर्चा वाचल्याचे आठवते. तथापि या विषयाच्या निमित्ताने 'विचार तर कराल' या पुस्तकातली काही उदाहरणे देतोः
मृत व्यक्तीच्या अपुऱ्या इच्छा, वासना बाकी असतील तर पिंडाला कावळा लवकर शिवत नाही असा समज आहे. एका अभ्यासात ऐन तारुण्यात अपघातात गेलेल्या व्यक्ती, अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या अंगावर असताना अचानक निधन पावलेले लोक अशा लोकांच्या पिंडदानाच्या वेळी कावळा पिंड ठेवल्यानंतर किती वेळाने शिवतो याची नोंद केली.खरे तर या मृतात्म्यांच्या मागे प्रचंड अतृप्त इच्छांचे मोहोळ होते...परंतु सत्तर टक्क्यांहून अधिक वेळा कावळा पटकन पिंडाला शिवला.
शहरातले कावळे खेड्यातल्या कावळ्यांपेक्षा माणसांना अधिक सरावलेले असतात. शहरातल्या कावळ्यांची संख्या आणि त्यांना उपलब्ध असलेले खाद्य याचे खेड्याशी तुलना केल्यास खेड्यात पिंडाला कावळा लवकर न शिवणे समजू शकते.
आणि शेवटी एक बिनतोड प्रश्नः जन्मभर शाकाहारी असलेल्या माणसाचे खमंग, मांसाहारी पिंड मांडले तर कावळे त्यापासून दूर रहातील का भराभरा गोळा होतील?
सन्जोप राव