या कथेचा मला कळलेला अर्थ हा की माणसाची भूक ही कर्मकांडापेक्षा मोठी आहे आणि हे सहजच पटणारे असून वादातीत आहे. आता श्रद्धेचेही जीवनात स्थान आहेच. एखाद्या मुलाचे वडील वा आई लहानपणी गेले व फोटो दाखवून त्यास हे वडील वा आई आहे हे सांगितल्यावर तो मुलगा श्रद्धेने ते मान्य करतो व पुराव्या शिवायही त्याचे आयुष्य चालू रहाते. मानवाच्या तर्कापलीकडे खरे तर खूप काही आहे. म्हणूनच ' सायन्स विल टेल यू हाऊ, इट मे नॉट टेल यू व्हाय' असे म्हणतात.

-(विज्ञानप्रेमी व सश्रद्ध) अभिजित