दिगम्भा,

खरंच सांगते केवळ तुमचं नाव होतं म्हणून मी हा लेख उघडला ( कारण तुम्ही या विषयावर काहितरी लिहिण्याचा मनोदय व्यक्त केला होतात, जो मी वाचला होता ! ) ! या विषयात मला काही गती नाही, हे मी आधीच कुठेतरी नमूद केलेलं आहे. तुमचा हा लेख वाचत गेले आणि हुरूप येत गेला की काहीतरी नक्कीच शिकायला मिळणार आता ! पण रंगीबेरंगी अक्षरांना सुरूवात झाली आणि माझा फुल्टू बंटा ढार झाला ! ही अक्षरं खूप चिरपरीचयाची आहेत पण ती वाचलीच की एक अनामिक भीती दाटते मनात ( आता काही कळणार नाही यापुढे तुला ! असं म्हणत माझ्याच आत माझ्याचवर कोणीतरी खदखदत हसतं आहे असं वाटतं ! माफ करा.. मी जरा जास्तच स्पष्ट लिहिते आहे त्याबद्दल.. ). 'यातून काय मिळेल' नंतरचा ( रंगीबेरंगी अक्षरांच्या आधीपर्यंतचा ) मजकूर वाचून जबरदस्त आनंद झाला होता.. तो मावळणार नाही अशाचप्रकारचं लेखन तुमच्याकडून होवो आणि मला जुजबी माहिती कळून या अनमोल शास्त्रीयसंगीताच्या ठेव्याशी किमान तोंडओळख तरी होवो हीच अपेक्षा आणि त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.