मुंबईबाहेरील स्पर्धकांनी [पुणेकरांनीसुद्धा] स्वखर्चाने मुंबईस यावे, अन्यथा आपापल्या ठिकाणी स्पर्धेसाठी पर्यायी स्थळे शोधून काढावीत.
हे वाक्य कळले नाही. टग्या उसगावात असतो असेच वात्रट समजत होता.
उसगावात असणे हे चढाओढ मुंबईत आयोजित करण्याच्या नेमके कसे आड येते, हे कळले नाही.
[तसेही अशा चढाओढीपासून आयोजकांनी [भविष्यकाळाचा विचार करून] जरा दूरच राहणे इष्ट नाही काय? ;-) नाही म्हणजे, खणून झाल्यावर स्पर्धकांना हात धु[वून घे]ण्याची इच्छा होणे साहजिक असावे...]
[[नसलेले] गुप्तधन शोधण्यासाठी] खणायला [गिरगाव] चौपाटीइतकी उपयुक्त [आणि सर्वज्ञात] जागा नसावी, असे वाटले एवढेच चौपाटीला आयोजनामागील प्रयोजन. [याबाबत दुमत असू शकते. असल्यास [म्हणजे दुमत आणि आवडीची दुसरी जागा] आपल्या आवडीची दुसरी एखादी जागा निवडावी.]
हे सर्व थोडेसे 'पुणेरी पाट्यां'च्या मार्गाने जाऊ लागले होते, असे वाटल्याने, आणि 'पुणेकरांसाठी सर्व नियम वेगळे असतात' हे तत्त्व लक्षात घेता, पुणेकरांविषयीच्या त्या उल्लेखाची आवश्यकता भासली. [एक भूतपूर्व पुणेकर या नात्याने, मला वाटते, एवढे विधान मी बिनदिक्कतपणे करू शकतो.] तसेही नंतर [बहुधा पुण्याहूनच] 'एक्स्पेन्स व्हाउचरां*'चा [मराठी प्रतिशब्द?] भडिमार होऊ नये यासाठी एवढी किमान पूर्वदक्षता घेणे गैर नसावे.
[*पोस्टेजखर्च अंतर्भूत]
असो. प्रतिसादाबद्दल आभार.
- टग्या.