जोपर्यंत इंद्राला 'निवडून' यावे लागणार नाही तोपर्यंत
इंद्र ही विशिष्ट व्यक्ती (चुकलो, देव) नसून ते एक पद आहे. (थोडक्यात 'इंद्र हा देवांचा राजा' नसून 'देवांचा राजा तो इंद्र' होय.)
आणि त्या पदासाठी तपश्चर्यारूपी 'निवडणूक' लढवावी लागत असे, असे काहीसे स्मरणात आहे. (विरोधी प्रतिस्पर्ध्याची उमेदवारी बाद ठरवण्यासाठी सद्यस्थित (incumbent) इंद्राकडून तपश्चर्याभंगासारख्या गैरप्रकारांकरिता मेनका, रंभा, उर्वशी इत्यादींची नियुक्ती होत असे, असेही ऐकिवात आहे. तत्कालीन निवडणूकआयोग अकार्यक्षम असल्याचे हे द्योतक असावे.)
- टग्या.