पाचव्या मुद्द्यातील 'ऐश्वर्याकृपेकरून' म्हणजे नक्की काय कळले नाही.

हा 'ईश्वरकृपेकरून*'वर श्लेष (श्लेषच ना हो? नसला तर निदान शब्दखेळ तरी) असावा. 'ऐश्वर्या ही नीलाक्षी असल्यामुळे आपल्या गृहीतकानुसार' असे सुचवायचे असावे.

- टग्या.

अवांतर/संदर्भ: लग्नपत्रिकांत वगैरे 'आमचे येथे ईश्वरकृपेकरून (पाठभेद: ईश्वरकृपेरून, श्रीकृपेकरून) आमचा सुपुत्र चि. बंड्या याचा शुभविवाह चि.सौ.कां. बाळी (श्री. व सौ. सोम्याभाऊ गोमेकर यांची सुकन्या) हिजबरोबर (पाठभेद: इजबरोबर) करावयाचे योजिले आहे. कार्य तडीस नेण्यास श्री समर्थ आहेत. तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून वधुवरांस आशीर्वाद द्यावेत, ही विनंती' वगैरे वाचले असेलच.