कथेचा अनुवाद छान झाला आहे. पहिल्या भागात सुरुवातीसुरुवातीला भाषा थोडी अवजड/कृत्रिम/ओढूनताणून शब्दशः भाषांतर केल्यासारखी वाटली. (उदा. पहिलीच काही वाक्ये: 'मी शेरलॉक होम्सच्या केसेसबद्दल नोंदी ठेवत असतो आणि त्या वेळोवेळी काढून माझ्या मित्राचे बुद्धिचातुर्य आणि एकूणच परिस्थितीचे अचूक विश्लेषण करून त्यातील गाभा जाणून घेण्याचे कसब पाहताना आश्चर्यचकित होणे मला आवडते.' किंवा 'आजपर्यंत माझ्या हातून लिहिल्या गेलेल्या सर्व कथांमधे या कथेमधल्या विचित्र आणि धक्कादायक घटनाक्रमासारखे प्रसंग सापडणार नाहीत.'. किंवा 'माझी बायको तिच्या माहेरी गेली होती' शब्दशः वाटते. नुसते 'माहेरी' म्हटले असते तर झकास मराठी वाक्य झाले असते; 'आपल्या माहेरी' चालले असते, 'तिच्या माहेरी' नुसतेच शब्दशः भाषांतर नव्हे, तर चुकीचे मराठी झाले. असो.) पण नंतर छान जमली आहे. मूळ कथा चांगली आहेच, पण अनुवादातही शेवटच्या ओळीपर्यंत उत्सुकता/उत्कंठा टिकवून ठेवणे / कथा पुढे वाचावीशी वाटणे जमले आहे.
- टग्या.
अवांतर: लेखिकेने आपले टोपणनाव इतक्या वारंवार न बदलल्यास बरे होईल, असे वाटते. (अर्थात तो लेखिकेचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तरीही ही सुचवण.)