मीराताई -
आपली कृपादृष्टी (निळसर (?) तिरपा कटाक्ष किंवा काळीनिळी वाकडी नजर नाही!) या घोटाळ्याकडे असेल याची खात्री होतीच. स्वागत आहे!!
(आता 'ती तू नव्हेच' असे मात्र म्हणू नका!)
दिलेली उदाहरणे काल्पनिक आहेत असा खुलासा दिलेला नाही हा घोटाळा झाला खरा. त्यामुळे जर आजूबाजूस साधर्म्य आढळलेच तर जरूर संबंध जोडावा. ती तू नव्हेच अशी पळवाट न काढता रोष स्वीकारण्याची एकलव्याची तयारी.
गंमत बाजूस - पण अनावधानाने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास बिनशर्त माफी!
सिद्धतेत 'सॉल्लीड' घोटाळे आहेत
हे तर खरेच! पण मी म्हणेन एकच घोटाळा दडलेला आहे...बाकी सारे काही सुतासारखे सरळ आहे!!